ऐतिहासिक किल्ला बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड…पर्यटनस्थळ उघडण्याची मागणी

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) शहरातील ऐतिहासिक (Historical) किल्ला (fort) कोविड-१९ प्रादुर्भाव काळात गेली सहा महिने बंद असुन राज्यातील पर्यटनस्थळ खुले करण्याचा निर्णय अद्याप झाला नाही. धारुर (Dharur) किल्ला (fort) खुला करण्याची मागणी पर्टनासाठी आलेल्या पर्यटकांतून होत आहे.
मार्च २०२० मध्ये देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. राज्यातील पर्यटनस्थळे राज्य शासनाने पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गेली सहा महिने येथील ऐतिहासिक किल्ला (fort) बंद आहे. धारुर (Dharur) किल्ल्यात पुरातत्व खात्याने दुरुस्ती केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पर्यटक वाढली आहेत. कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक लोक गावाकडे परतली. पर्यटनासाठी ऐतिहासिक किल्ल्यात (fort) अनेकांनी हजेरी लावली. मात्र कुलूप बंद असल्याने पर्यटनाशिवाय परतण्याची वेळ त्यांच्यावर येत होती. जूनमध्ये केंद्र व राज्य सरकारने अनलॉकची भुमिका घेतली. मात्र अद्यापही ऐतिहासिक (Historical) स्थळ पर्यटकांसाठी खुली केलेली नाहीत. केंद्राच्या अखत्यारीतील काही पर्यटनस्थळे सुरु झाली आहेत. मात्र राज्यात आजही पर्यटनस्थळ खुली होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. सतत पर्यटक येथील ऐतिहासिक (Historical) भेट देण्यासाठी येत आहेत. मात्र किल्ला (fort) बंद असल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. प्रा. नारायण शिनगारे यांनी आज दि.२९ रोजी किल्ल्यास भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने ऐतिहासिक किल्ल्याचे द्वार उघडून पर्यटनस्थळ खुले करावीत अशी मागणी केली.