कोविड सेंटरवर पत्रकारांनी काय केले…? पहा सविस्तर…
मराठी पत्रकार परिषदेचा कौतूकास्पद उपक्रम

किल्लेधारूर दि.६(वार्ताहर) कोरोना (corona) पॉझिटीव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची काळजी घेणाऱ्या येथील कोविड केअर सेंटर (covid-19 care center) वरील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जोखमीचे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांना वाशेबल पीपीई किट (PPE kit) व मास्कचे (Mask) वाटप पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले.
शहरातील आगस्ट महिन्यात सुरु झालेले कोविड (covid-19) केअर सेंटर जिल्ह्यात अपुरी कर्मचारी संख्या असताना दिल्या जाणाऱ्या चांगल्या सेवेमुळे चर्चेत आहे. याठिकाणी उपचार घेवून परतणाऱ्या सर्वच रुग्णांच्या प्रतिक्रिया येथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रशंसनीय आहे. यामुळे मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस तथा विद्यमान प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व पत्रकारांचे नेते एस.एम. देशमुख यांच्या आदेशावरुन या कर्मचाऱ्यांचा कौतूकाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोविड (covid-19 केअरची धुरा यशस्वी पणे सांभाळणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने, डॉ. तफील तांबोळी, डॉ. सोनिया मुंडे, डॉ.तेजस्विनी नेहरकर, डॉ.गितांजली कोलते पाटील, नवीन रुजू झालेले डॉ. मयूर सावंत, अशोक कावळे, अभिषेक पुजारी, चाटे स्वप्नील, हर्षवर्धन अंडील, माऊली रीड्डे, अंकुश खरगे, अश्विनी बनसोडे, स्वाती घुले, मनीषा काळे, पल्लवी सूर्यवंशी, वर्षा कोल्हे, अतुल राऊत, प्रवीण लोखंडे, प्रियांका गवळी, ज्योती पोळ, ज्योती राठोड, अलका शिंदे, प्रगती पायल, बाळासाहेब पुजदेकर या तरुणाईचा सत्कार करण्यात आला. वाशेबल पीपीई (PPE kit) किटसह मास्कचे (Mask) वितरण यावेळी करण्यात आले. पत्रकार संघाच्या वतीने अनिल महाजन यांनी प्रास्ताविक केले. तर सय्यद शाकेरअली यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रमासाठी पत्रकार संघाचे सचिव अतुल शिनगारे, सतीश वाकुडे, हरिभाऊ मोरे, सतीश पोतदार, दिनेश कापसे, इश्वर खामकर, दिलिप सिरसट, राष्ट्रवादीचे युवानेते तानाजी नागरगोजे उपस्थित होते. याप्रसंगी कोविड (covid-19 केअर सेंटरवरील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले.