कोरोंना विशेष

धारुरमधील आजची पॉझिटीव्ह रुग्ण; पहा किती व कोणत्या भागातील आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.१३(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या १३ ॲन्टीजन (antigen) तपासणीत ३ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. तर काल पाठवण्यात आलेल्या ८ स्वॅब (Swab) पैकी ३ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहेत. आजचे पॉझिटीव्ह रुग्णात शहरातील ३ व ग्रामीण भागातील तिघांचा समावेश आहे.

आज १३ ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या. या तपासणीत ३ पॉझिटीव्ह आढळली असून १० निगेटिव्ह आले आहेत. काल पाठवलेल्या ८ स्वॅब (Swab) नमुन्यापैकी ३ पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाली आहेत. आज तब्बल ४२ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (antigen) तपासणीत आढळलेले रुग्ण

१. ३५ वर्षीय पुरुष, कटघरपुरा, धारुर

२. ४१ वर्षीय पुरुष, अंजनडोह, ता.धारुर

३. ७५ वर्षीय पुरुष, आसोला, ता.धारुर

स्वॅब (Swab) नमुन्यात आढळलेले

४. ३८ वर्षीय पुरुष, चोरांबा, ता.धारुर

५. २१ वर्षीय पुरुष, मठ गल्ली,कसबा, धारुर

६. ३८ वर्षीय पुरुष, कसबा, धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!