धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच मी प्रयत्नशील राहिल-आ.प्रकाशदादा सोळंके

माजलगाव- दि.१४(प्रतिनिधी) आज आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या माजलगाव येथील निवासस्थानी असलेल्या कार्यालयात धनगर समाज बांधव यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत धनगर समाजाचे नेते माधवराव निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली हिंगणी , ढोरगाव, मुंगी, नागडगाव, गोविदपुर येथील आजी-माजी सरपंच उपसरपंच व ग्रा.सदस्य यांनी आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या वेळी प्रास्ताविक समाजकल्याण सभापती कल्याण आबुज यांनी केले. प्रास्ताविक मध्ये ते म्हणाले की. धनगर समाज बांधव यांना राजकारण न्याय द्यायचे काम हे आमदार प्रकाश दादा सोळंके साहेब यांनी केले. व भविष्यात देखील ते माधव तात्या निर्मळ यांना मोठी संधी देऊन न्याय देतील. माधवराव निर्मळ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. धनगर समाज बांधव यांचे प्रश्न दादा नेहमीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व भविष्यात देखील ते प्रयत्नशील राहतील. व येणार्या काळात धनगर समाज बांधव यांची मोठी ताकद पक्षाच्या व दादाच्या पाठीशी उभी करू असा विश्वास व्यक्त केला. या वेळी आपल्या भाषणात आ. प्रकाशदादा सोळंके म्हणाले की मी नेहमी आपल्या व आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहिल. आरक्षणाचा देखील मुद्दा अनेक वेळा सरकार दरबारी मांडला आहे व यांचा पाठपुरावा देखील करत आहे. याच बरोबर मराठवाड्यातील एक शिष्टमंडळ घेऊन आपण पवार साहेब यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडू असे देखील म्हणाले. याच बरोबर आता व्यवसायासह तरूण मुलांनी देखील शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन. शिक्षणाकडे वळायला हवे. गेल्या सरकार फक्त धनगर समाज बांधवयांची फसवणूक केली आहे. येणार्या काळात नक्कीच माधव निर्मळ यांना मोठी संधि पक्ष देईल. या साठी पाठपुरावा करेल असा शब्द दादानी या पक्ष प्रवेश व बैठकीच्या कार्यक्रमात दिला. यावेळी उपस्थित जयसिंगभैय्या सोळंके, चंद्रकात शेजुळ, प्रकाश गवते, विश्वभंर थावरे,रमेश सोळंके, सभापती संभाजी शेजुळ, एन टी सोळंके ख.वि चेअरमन, सातपुते मामा, जयदत नरवडे, भिमकराव हाडुळे आण्णासाहेब वगरे, गणेश शिंदे, अमर ढोणे, इतर उपस्थित होते. यावेळी पक्ष प्रवेश जयदेव सलगर सरपंच मुंगी, विजयकुमार शिंदे उपसरपंच, पद्माकर विर ग्रा. सदस्य बिभीषण शेडगे ग्रा.सदस्य हिंगणी, रणजित रूपनर भाजप युवा मोर्चा सरचिटणीस धारूर, गजानन खामकर माजी सरपंच नागडगाव, सुखदेव मुळे ढोरगाव ग्रा. सदस्य, बाजीराव कुंडकर गोविदपुर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यात आला.