आ. प्रकाशदादा सोळंके यांनी घेतली पवारांची भेट

मुंबईः दि.२०- मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर माजलगाव मतदारसंघातील परिस्थिती व विविध प्रलंबित विकास कामांच्या बाबतीत आ. प्रकाशदादा सोळंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली.
माजलगाव मतदारसंघाचा औद्योगिक विकास व्हावा,इथल्या तरुणांना बाहेरगावी न जाता इथेच हाताला रोजगार मिळावा. यासाठी एम. आय. डि .सी. प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा. तसेच माजलगाव मतदारसंघातील अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक मदत द्यावी या मागणीचे निवेदन माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना आ.सोळंके यांनी दिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्री मंडळ विस्तार, विविध महामंडळाच्या नियुक्त्या व आगामी काळात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकी बाबत चर्चा सुरु आहेत. आ. सोळंके यांची पवार भेट यामुळे महत्वाची मानली जात आहे. माजलगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा यामुळे उंचावल्या आहेत.