ऊसतोड कामगारांचा दरवाढीचा करार लवादा मार्फत सिटूला अमान्य ;

सोमवारी जिल्हाभर प्रचंड निदर्शने, रास्ता रोको, धरणे आंदोलन

बीडः दि.२५(प्रतिनिधी) ऊसतोडणी कामगारांना दरवाढ देणारा करार ऊसतोड कामगार संघटनांशी चर्चा करून करावा, लवादा मार्फत नको या मागणीसाठी सिटू महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना सिटूच्या वतीने सोमवार दि.२६ रोजी जिल्हाभर प्रचंड निदर्शने, रास्तारोको, धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. दत्ता डाके यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

कामगारांचा वेतन करार राज्य सरकार, साखर संघ व कामगार संघटनाचे प्रतिनिधी यांच्या मध्ये होत असतो. तो करार असाच त्रिपक्षीय करावा लवादा मार्फत नको, अशी आग्रही मागणी सिटू प्रणित महाराष्ट्र उसतोड़णी व वाहतूक मुकादम कामगार संघटनेच्या वतीने साखर संघाच्या चेअरमन कडे केली आहे. उसतोड़णी, वाहतूकदार, मुकादम कामगार यांच्या मजूरी वाढीचा वेतन त्रिपक्षीय सामंजस्य करार प्रलंबित आहे. सहापैकी चार संघटनांनी साखर संघाने राज्य सरकारच्या प्रतिनिधिच्या उपस्थितीत उसतोड़णी कामगार मुकादम वाहतूकदार यांच्या संघटनांबरोबर चर्चा करून मजूरीवाढीचा सामंजस्य करार करावा अशी मागणी केली आहे. मात्र राज्य सहकारी साखर संघ नेहमी प्रमाणे उसतोड़णी कामगारावर लवादाचा निर्णय लादण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या आरोप कॉ.डाके यांनी केला आहे. वेतन कराराबाबत लवादाच्या मार्फत निर्णय करण्यास सिटू उसतोड़णी कामगार संघटनेसह बहुसंख्य कामगार संघटनांचा विरोध आहे. उसतोड़णी वाहतूक मुकादम कामगारांच्या वेतन कराराबाबत निर्णय करण्यासाठी कुणाचाही लवाद नेमू नये, तो मान्य नाही व लवादाने निर्णय घेतल्यास तो आमच्यावर बंधनकारक राहणार नाही, उसतोड़णी कामगार संघटनांच्या प्रतिनिधि व शासनाचे प्रतिनिधि,मा. सहकार मंत्री, साखर आयुक्त व कामगार आयुक्त,आदी यांचे उपस्थितीत चर्चा करून उसतोड़णी वाहतूकीचे दरवाढ कमिशनवाढ इत्यादी बाबत निर्णय तात्काळ करण्यात यावे. या इतर मागण्यासाठी सिटू महाराष्ट्र उसतोड़णी वाहतूक मुकादम कामगार संघटनेच्या सोमवारी होणाऱ्या आंदोलनात उसतोड़णी वाहतूक, मुकादम, कामगार यांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष कॉ. दत्ता डाके, ॲड.अजय बुरांडे, सय्यद रज्जाक, मोहन जाधव, सुदाम शिंदे, अंगद खराद, आबा राठोड, बंडू राठोड, जगन्नाथ जाधव, विनायक चव्हाण, अशोक थोरात, मनीषा करपे, सखाराम शिंदे, पंडित शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!