अनैतिक संबंधामूळे सुन व प्रियकराचा काढला काटा….

विधवा सुनेच्या अनैतिक संबंधाना वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून जीवे मारले
जालना : विधवा सुनेच्या अनैतिक संबंधाना वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून जीवे मारल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील चापडगाव येथे घडली. भागवत प्रल्हाद हरबक आणि मारिया विनोद लालझरे अशी मृतांची नावं असून पोलिसांनी दोघा आरोपीना ताब्यात घेतले आहे.
कुंभारपिंपळगाव येथे मयत भागवत आणि मारिया हे दोघे दुचाकीवर एका संघटनेच्या मेळाव्याला गेले. जवळपास दीड तासानंतर भागवतच्या दुचाकीचा अपघात झाल्याची बातमी कुटुंबियांना समजली. गंभीर जखमी अवस्थेत भागवतला नेत असताना भागवतने आईला विकास बथवेल लालझरे याने मुद्दामहून आमच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तर मारियाचाही रुग्णालयात नेताना मृत्यू झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, भागवत हरबक आणि मारिया लालझरे यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तर सहा महिन्यांपासून ते दोघे एकत्र राहत होते. याचा राग मारियाचे सासरे आणि दीर यांना होता. दोघांच्या अनैतिक संबंधाचा राग मनात ठेवून बथवेल लालझरेच्या सांगण्यावरुन विकास बथवेल लालझरेने आपल्या ट्रॅक्टरने मारिया आणि भागवत यांना चिरडून मारलं. यात दोघांचाही मृत्यू झाला. मयत भागवत हरबक याच्या आईच्या फिर्यादीवरुन मारियाचा सासरा बथवेल लालझरे आणि मुलगा विकास लालझरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही अटक केली आहे.