सांस्कृतिक
बंजारा समाजाचे धर्मगुरु संत डॉ.रामरावबापूंचे देहावसान

मुंबई दि.३१(प्रतिनिधी)- देशभरातील बंजारा समाजाचे धर्मगुरु संत डॉ. रामरावबापूं महाराजांचे Ramraobapu Maharaj मुंबई येथे लालावती रुग्णालयात वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बंजारा Banjara समाजावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
श्वसनाच्या त्रासामुळे संत डॉ. रामरावबापूं महाराजांना Ramraobapu Maharaj दि.१७ रोजी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. संपूर्ण देशभर असलेल्या बंजारा Banjara समाजाचे ते श्रध्दास्थान होते. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या देवस्थानचे ते प्रमुख होते. त्यांच्या निधनामुळे बंजारा समाजात शोककळा पसरली आहे.