डोंगरपट्ट्यात भटक्या कुत्र्यांची दहशत; २४ शेळ्या केल्या फस्त

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) तालुक्यातील डोंगर पट्ट्यात भटक्या कुत्र्यांची stray dogs दहशत Terror असुन सदरील कुत्री जंगली प्राण्यांसह पाळीव प्राण्यांची शिकार करत असल्याचे दिसुन येत आहे. जागिर मोहा येथील तीन शेतकऱ्यांची २४ शेळ्यांची Goats पिल्ले या कुत्र्यांनी मारल्याची घटना रात्री घडली आहे.
शहर व तालुक्यात सध्या भटक्या कुत्र्यांची stray dogs संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कुत्र्यांनी आता परिसरातील डोंगर पट्टीच्या भागाकडे मोर्चा वळवत जंगली प्राण्यासह पाळीव प्राण्यांना लक्ष केले आहे. तालुक्यात वन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे हरिण, ससे, साळींदर सारखे प्राणी व मोर, लांडोर, चित्तर सारख्या पक्षांची संख्या मोठी आहे. या प्राणी व पशूंची शिकार करण्यासाठी पाच ते दहा भटक्या कुत्र्यांची stray dogs टोळी डोंगरात सक्रीय आहे. या कुत्र्यांनी आता शेळ्या Goats सारख्या पाळीव प्राण्यांनाही लक्ष करणे सुरु केले असुन तालुक्यातील जागिर मोहा येथील तीन शेतकऱ्यांची तब्बल २४ शेळ्या Goats या कुत्र्यांनी फस्त केल्याचे रात्री उघड झाले. शहरातील बामदरी, मुहपसारी, नागदरा, मंत्रीदरा परिसरातही कुत्र्यांची दहशत Terror आहे. जागीर मोहा परिसरातील वाघदरा व डोलदरा भागात दि.४ रोजी १० तर आज १४ आठ ते दहा महिने वयाची शेळ्यांची Goats पिल्ले मृत अवस्थेत आढळली. जागीर मोहा येथील शामू सिताराम मंदे, बप्पा दादाराव मंदे, आश्रुबा रानबा चिरके या शेळीपालकांचे जवळपास ७० ते ७५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांची stray dogs व्यवस्था करुन शेळीपालकांना मदत करावी अशी मागणी होत आहे.