बिहार पाठोपाठ गुजरात, मध्य प्रदेश व तेलंगणातही भाजपाला दिवाळी गोड… पहा विजयी जागा  

बिहार विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवत गुजरात, मध्य प्रदेश व तेलंगणातही पोट निवडणूकीत  भाजपाला मोठे यश मिळाल्याने दिवाळी गोड झाली आहे.

बिहारमध्ये एनडीए NDA ची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार Bihar विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागा मिळवल्या आहेत. या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपाने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाआघाडीने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी केली आहे ती राजदने. तेजस्वी यादव Tejasvi Yadav यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाआघाडीतल्या काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. बिहार Bihar विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून एनडीएला बहुमत मिळालं आहे आणि नितीश कुमार Nitish Kumar हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

गुजरात Gujrat

भाजपाने BJP गुजरात Gujrat विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दमदार कामगिरी करत, मंगळवारी सर्व आठ जागांवर विजय मिळवला आहे. तर, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेच्या वाट्याला एकही जागा आली नाही.

उत्तर प्रदेश Uttar Pradesh

उत्तर प्रदेशात Uttar Pradesh विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सहा जागा पटकावून भाजपने BJP राज्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे तर समाजवादी पार्टीने (सपा) एक जागा जिंकली आहे. भाजपच्या उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू चैतन चौहान यांच्या पत्नी संगीता चौहान या नौगाव सादत मतदारसंघात विजयी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे उषा सिरोही (बुलंदशहर), प्रेमपाल धनगर (तुंडला), श्रीकान्त कटियार (बंगरमऊ), सत्यप्रकाशमणी त्रिपाठी (देवरिया) आणि उपेंद्रनाथ पासवान (घाटमपूर) हे भाजपचे अन्य उमेदवार विजयी झाले आहेत.

तेलंगणात Telangana भाजपची BJP मुसंडी

तेलंगणमधील Telangana दुब्बक विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार एम. रघुनंदन राव विजयी झाले आहेत. राव यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आणि टीआरएसच्या उमेदवार सोलीपेटा सुजाता यांचा १०७९ मतांनी पराभव केला. राव यांना ६३ हजार ३५२ मते मिळाली तर सुजाता यांना ६२ हजार २७३ मते मिळाली. टीआरएसचे विद्यमान आमदार एस. आर. रेड्डी यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!