काँग्रेसचा चाणक्य हरवला…. अहेमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली दि.25 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांचं वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. कोरोनाची (Corona) लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारा दरम्यान आज बुधवार रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
गुजरातचे राज्यसभा खासदार अहमद पटेल यांचं पहाटे 3.30 वाजता निधन झाले अशी माहिती त्यांचे सुपुत्र फैसल पटेल यांनी दिली. माझ्या वडिलांना महिन्याभरा आधी कोरोनाची (Corona) लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचे अवयव निकामी झाले. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. त्यामुळे त्यांचे निधन झाले, अशी माहिती फैसल पटेल यांनी दिली. अहेमद पटेल (Ahmed Patel) यांच्या निधनामुळे काँग्रेस चा चाणक्य गेला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.