पिण्याचे पाणी मागून महिलेवर सामुहिक अत्याचार

कल्याण: दि.४-  पिण्यासाठी पाणी मागून घरात घुसत एका २२ वर्षीय विवाहितेवर दोघांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना काल कल्याण जवळ टिटवाळा येथील कांबा परिसरात घडली. या प्रकरणातील दोन्ही नराधमांना अवघ्या तासाभरात टिटवाळा (Titwada) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आज कल्याण (Kalyan) न्यायालयाने त्यांना 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महिलेने टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देताना फक्त मारहाण झाल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. गौतम गाणे आणि बळीराम गायकवाड अशी या नराधमांची नावे आहेत. पाणी मागण्याच्या बहाण्याने हे दोन्ही नराधम घराजवळ आले. महिला घरात पाणी आणण्यासाठी जाताच दोघांनी घरात घुसून विवाहितेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. याप्रकरणीय टिटवाळा (Titwada) पोलिसांनी (Police) दोन्ही नराधमांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत अवघ्या एका तासाच्या आत गौतम गाणे आणि बळीराम गायकवाड या दोघांना अटक केली आहे. या दोघांनाही कल्याण (Kalyan) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे टिटवाळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. टिटवाळा पोलीस (Police) स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!