पाच एकर ऊस जाळला… तरीही बिबट्याचा गुंगारा

करमाळा: दि.८- आष्टीनंतर (Ashti) आता करमाळा (Karmala) तालुक्यातही तीन बळी घेणाऱ्या बिबट्याला (Leopard) मारायचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने बिबट्याचे वास्तव्य असलेल्या चिखलठाण परिसरात मोठी दहशत पसरली आहे. काल सकाळी साडेअकरा वाजता या ठिकाणी एक 9 वर्षांच्या ऊसतोड मजुरांच्या मुलीवर हल्ला केला होता. या परिसरातील ऊसात बिबट्या (Leopard) पळाल्यानंतर त्याला ठार करण्याचे प्रयत्नांतून पाच एकर ऊसाचे उभे पिक जाळण्यात आले मात्र बिबट्याने यातूनही गुंगारा दिला.

काल सकाळी बिबट्याने हल्ला केलेल्या मुलीचा आवाज ऐकताच इतर ग्रामस्थ काठ्या घेऊन आल्यावर त्याने मुलीला सोडून शेजारील उसात पळ काढला. यानंतर मोठ्या संख्येने वन विभाग (Forest Department) व पोलिसांचा Police सशस्त्र फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याला ठार करण्याचे प्रयत्न सुरु झाले. या ऊस फडाशेजारी वागर (जाळं) लावून वन विभागाचे (Forest Department) गन मॅन, शार्प शूटर व पोलीस (Police) अधिकारी उसात जाऊन तपास करीत होते. त्यामुळे बिबट्याने मोर्चा शेजारील केळीच्या बागेत वळवला. येथे शार्प शूटरने फायर केले. मात्र, ते चुकवत बिबट्याने परत उसात धूम ठोकली. यानंतर वन अधिकाऱ्यांनी सर्व ऊस चारी बाजूने पेटवताच बिबट्या एका बाजूने दुसऱ्या केळीच्या बागेत निसटल्याने हे मिशन फेल झाले. या सर्व नाट्यमय घडामोडी घडत असताना करमाळा आ. संजय शिंदे हे आपले पिस्तूल घेऊन ग्रामस्थांच्या सोबत थांबले होते. रात्री नव्याने सर्च लाईटमध्ये पुन्हा वन विभाग सर्च ऑपरेशन राबवले. एक डिसेंबरपासून हा बिबट्या करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी, अंजनडोह आणि शेटफळ चिखलठाण परिसरात आपली दहशत ठेऊन आहे. आजपर्यंत तीन जणांचा बळी ह्या बिबट्याने घेतला आहे. आज चिखलठाण परिसरातील बारकूंड यांच्या शेतात तो दिसला होता. शार्प शूटर डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्यासह पाच गनमॅन ट्रॅप लावून बसले होते. बिबट्याला घेरण्यासाठी ऊस चारही बाजूने पेटवून दिला. पण त्याला अंदाज आल्याने बिबट्या सर्वांना गुंगारा देऊन निसटला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!