पोलिसच अटकले चोराच्या तावडीत… अन काय झाले पहा..

बीड: दि.१०- बीड जिल्ह्यातील येळंबघाट येथे कारमधून प्रवास करणाऱ्या चक्क पोलिसांचीच गाडी अडवून त्यांना बेदम मारहाण चोरांकडून झाल्याची घटना काल घडली. येवढेच नाही तर पोलीसाच्या गळ्याला चाकू लावून चक्क गुगल पे (Google pay) वरून एक लाख रुपये टाक अशी मागणी चोरांनी केली. वेळीच गावकरी धावून आल्यामुळे पोलिसांची चोरा कडून सुटका झाली आणि चार अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येळंबघाट जवळील पुलाखाली लूटमार करण्यासाठी शस्त्रांसह दबा धरुन चार कुख्यात गुंड बसले होते. एखाद्या चित्रपटांमध्ये घडावा असा थरार बीड नेकनुर मार्गावरती काल दुपारी दीड वाजता घडला. केज (Kaij) ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले सुग्रीव सक्राते मित्रासोबत कारमधून केजहून (Kaij) बीडकडे निघाले होते. सुग्रीव सक्राते यांची गाडी येळंब घाटच्या पुलाजवळ आली त्यावेळी पाठीमागून आलेल्या मोटरसायकल वरच्या दोघांनी कार समोर मोटरसायकल आडवी लावली. या दोन चोरांनी सर्वात आधी समाधान खराडे यांना कारमधून खाली खेचून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांचे मित्र सुग्रीव सक्राते यांनी सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांनाही मारहाण करायला सुरुवात केली. हे नेमके काय घडत हे कळण्या आधीच येळंबघाट च्या रस्त्यावर फिल्मी स्टाईल हाणामारी चा थरारक घडत होता. मोटरसायकल वरून आलेल्या मोहम्मद अब्दुल लतीफ याने कमरेला लावलेला धारदार चाकू काढून खराडे यांच्या गळ्याला लावला व हातातील घड्याळ आणि मोबाईल (Mobile) बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर पैशाची मागणी केली, मात्र पैसे नाहीत असे म्हटल्यानंतर चक्क गुगल पे (Google pay) वरून एक लाख रुपये लवकर पाठव अशी मागणी चोरांनी यावेळी केली. दहा ते पंधरा मिनिट या दोन चोरासोबत हे दोघेजण मुकाबला करत होते. जवळच नेकनूर पोलीस वस्तीवर तैनात होते. या चौघांमध्ये हाणामारी चालू असतानाच रस्त्याने जाणाऱ्या एक जणांनी हटकले त्यावेळी त्या दोन चोरांनी त्याला दम देऊन सांगितले की तू निघून जा त्याने पुढे जाऊन गावकर्यांना सांगितले. गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि तेवढ्याच वेळामध्ये नेकनूर पोलीस (Police) सुद्धा आले त्यांनी दोन चोरांना ताब्यात घेतले. दिवसाढवळ्या चक्क रोड वरती चोरी करणाऱ्या या दोघांकडे झाडा झडतीत दोन लोखंडी चाकू, कत्ती, बटनचा चाकू, दातऱ्या व धार असलेले दोन चाकू, एक जांबिया अशी शस्त्रे आढळली. मारहाणीत जखमी झालेले पोलीस (Police) कर्मचारी समाधान खराडे याना केजमध्ये खासगी दवाखान्यात उपचारा साठी दाखल केले आहे. पोलीस (Police) कर्मचार्याने दिलेल्या तक्रारीनुसार कलम 394, 341, 4/25आर्म ॲक्टनुसार नेकनूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.