यूपीएचे अध्यक्ष पद शरद पवारांकडे…. प्रधानमंत्री पदाचेही असतील उमेदवार

नवी दिल्लीः दि.10- काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून खलबंत सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची यूपीएच्या (UPA) अध्यक्षपदी वर्णी लागू शकते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) येत्या काळात सेवानिवृत्त होणार असून त्या पदाची सगळी सूत्रे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हाती दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे या चर्चेनं देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. वृत्तवाहिन्यातून येणाऱ्या वृत्तानुसार लवकरच हे बदल दिसणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या भिन्न विचारसरणीच्या तीन पक्षांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. महाविकास आघाडी सरकार 5 नाही 25 वर्षे सत्तेत राहणार, असा मानस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीच्या वर्षपूर्ती निमित्त बोलून दाखवला आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वात देशात विरोधी पक्षांची मोट बांधावी, अशी इच्छा काँग्रेसनं व्यक्त केली आहे. विशेष विरोधी पक्षांतील नेते अमेरिकेतील जो बायडन थेरपी भारतात लागू करण्याची तयारी करत आहेत. म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा (PM) उमेदवार करण्याचीही त्यांची तयारी आहे. एका मराठी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी राष्ट्रीय पातळीवर करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे याबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती मिळाली आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचं शरद पवार यांनी नेतृत्त्व करावं, असं काँग्रेसनं प्रस्तावात म्हटलं आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कृषी कायदा रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांची भेट घेतली. यावरून आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना शह देण्यासाठी शरद पवार यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची तयारी काँग्रेसनं केली असल्याची जोरदार चर्चा सध्या माध्यमातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!