बीड जिल्ह्यात लाच लुचपत विभागाच्या कारवाईत दोघे गजाआड

बीडः दि.१७ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील आष्टी येथील सहाय्यक निबंधकाने संस्था नोंदणीसाठी सहा हजार रुपयांची लाच घेतांना बीड येथील लाचलुचपत अधिकाऱ्यानी दोघांना रंगेहाथ पकडले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वीच बीड जिल्ह्यातील वडवणी येथे तहसीलदारासह तिघांवर लाच लुचपत

(bribery department) विभागाने कारवाई केली होती. या कारवाईमुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी (Ashti) येथील सहाय्यक निंबधक सुधाकर वाघमारे आणि लिपीक कविता खेडकर यांनी संस्था नोंदणी करण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी केली होती. अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत अधिकाऱ्याकडे करण्यात केली होती. या प्रकरणी आज दि.१७ डिसेंबर रोजी दुपारी आष्टी (Ashti) येथील सहाय्यक निंबधक कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी ह्या लाचखोर अधिकारी वाघमारे याने संबंधित लिपीक कविता खेडकर यास देण्यास सांगितले असता तक्रारदाराने लिपीक खेडकर हिला सहा हजार रुपयांची लाच देत असतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे (bribery department) उपअधिक्षक बाळकृृृृष्ण हानपुडे, पोलिस निरीक्षक राजकुमार पांडवी यांनी केली आहे. या कारवाईने आष्टी तालुक्यात एकच खळबळ उडाली सदरील आरोपींना आष्टी पोलीस (Police) ठाण्याचा हजर करण्यात आले असून पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!