ऐतिहासिक

आज होणार धारुर शहराची इतिहासात आणखी एक नोंद…

किल्लेधारूर दि.६(वार्ताहर) धारुर शहराची ओळख एक ऐतिहासिक शहर म्हणून आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक (Historic) क्षण इतिहासात नोंदवली गेली आहेत. असाच एक प्रसंग आज दर्पण दिनाचे (Darpan Din) औचित्य साधून नोंदवला जाणार आहे. इतिहासात प्रथमच दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर (Jambhekar) यांचा अर्धाकृती पुतळा धारुरच्या नवोदित शिल्पकार सुधीर उमाप (Sudhir Umap) यांनी साकारला असून त्याचे आज मराठी पत्रकार परिषदेकडे लवकरच हस्तांतरण होणार आहे.

धारुर (Dharur) शहरात कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रात अनेक नामवंत होवून गेलेत. यापैकी शहराचे भुमिपुत्र चित्रकार वसंत बारस्कर यांनी महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. तसेच दुसरे भुमिपुत्र चित्रकार किसन धर्माधिकारी यांनी चित्रकलेसह वेगवेगळ्या कलाकृती बनवून आपलं नाव कला क्षेत्रात कोरुन ठेवलं आहे. यापाठोपाठ येथील नवोदित शिल्पकार आपल्या कलेचा अविष्कार करत ओळख निर्माण करु पाहत आहे. अल्पावधीत सुधीर उमाप (Sudhir Umap) याने अंबाजोगाई येथील थोर समाजसेवक द्वारकादास लोहिया यांची सुबक अर्धाकृती मुर्ती साकारल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिध्दी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्या विनंती वरुन एक ऐतिहासिक (Historic) कामगिरी पुर्ण करत आहे. आज दर्पण दिनी सुधीरने तयार केलेल्या राज्यातील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या पहिल्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. बाळशास्त्री जांभेकरांची मुर्ती तयार करणारा तो पहिला शिल्पकार ठरणार आहे. मराठी पत्रसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांनी (Jambhekar) आजच्या दिनी मराठी दर्पण हे नियतकालीक सुरु केले होते. संपूर्ण राज्यात आज दर्पणदिन (Darpan Din) साजरा होत असून आजच्या दिनी धारुरचं (Dharur) नावही दर्पणकारांची पहिली अर्धाकृती प्रतिकृती तयार केल्याची नोंद होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!