परळीत पोलीसांनी केली कारवाई… ११ जण ताब्यात

परळी दि.८ (प्रतिनिधी)- परळी (Parli) पंचायत समितीच्या सभापती उर्मिला गित्ते यांच्या वर अविश्वास ठराव संमत झाल्यावर त्यांचे पती बबन गित्ते यांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलीसांकडून काल ११ जणांना अटक करण्यात आली.
परळी (Parli) पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधात गुरुवारी अविश्वास ठराव पारित झाला. यावेळी यादरम्यान गदारोळ होवु नये म्हणुन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बबन गित्ते यांच्या घरासमोर पोलिस उपाधिक्षक सुनिल जायभाये, शहर पोलिस (Police) ठाण्याचे पो.नि. हेमंत कदम हे बंदोबस्तासह थांबले असता शंभर ते दिडशे युवकांचा जमाव जमला होता. यामुळे सध्या लागु असलेल्या कलम १४४ चे उल्लंघन होत होते. पोलीसांनी जमावास पांगण्याचे आवाहन केल्यानंतरही बबन गित्ते यांनी अडथळा आणल्याने पोलिसांनी गित्ते यांच्यासह ११ जणांना अटक केली.