आ.सोळंके आणि आडसकरांचा आ. रोहीत पवारांसमोर कलगीतूरा….

माजलगावः दि.१७- बीड जिल्ह्यातील हाय होलटेज रंगलेली माजलगाव मतदार संघाची निवडणूक होऊन वर्ष उलटून गेले तरी मात्र उभ्या राहिलेल्या आडसकर आणि सोळंके यांच्या मधील मात्र शाब्दिक फटके अजून हि सुरूच आहेत. पत्रकार संघाच्या दर्पण (Darpan) पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात पुन्हा एकदा आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) आणि भाजपाचे रमेश आडसकर (Ramesh Adaskar) यांच्यात आ. रोहीत पवार यांच्या समोर कलगीतुरा रंगल्याचे दिसुन आले.

कोणी कुठेही प्रतिनिधित्व करू शकते असा सूर रमेश आडसकर (Ramesh Adaskar) यांनी काढताच आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांनी त्या वक्तव्याला उत्तर म्हणून आधी प्रतिनिधित्व करायच्या मातीत काम करावे लागते तेव्हा जनता संधी देते असे उत्तर देऊन कोपरखळ्या सुरु ठेवल्या. माजलगाव पत्रकार संघाच्या दर्पण (Darpan) पुरस्कार सोहळा आणि कोरोना योद्धा पुरस्काराचे वितरण शहरातील राजस्थानी मंगल कार्यालयात काल दि.१६ शनिवार रोजी ठेवण्यात आला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar), आ.प्रकाश सोळंके, भाजप नेते रमेश आडसकर यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना रमेश आडसकर म्हणाले की प्रत्येक जण काम करत असतो आ.रोहित पवार (Rohit Pawar) यांचे उदाहरण देत ते बारामतीचे परंतू प्रतिनिधित्व करतात कर्जत जामखेड मतदार संघाचे, असे असताना बाहेरचं लांबचं असे काही नसते असे बोलताना त्यांनी सभागृहाला पटवून दिले. याला उत्तर म्हणून आ.सोळंके यांनी तुम्ही काम करा तुम्हाला देखील लोक प्रतिनिधीत्व करण्याची संधी देतील. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन्ही नेत्याच्या कोपरखळ्यांनी मात्र सभागृहाचे वातावरण चांगलेच गरम झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!