मराठवाडा विदर्भातील शेतकरी पुन्हा संकटात…. हवामान खात्याने दिला इशारा

मुंबई: दि.२७- देशातील अनेक राज्यांत कडाक्याची थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असताना येत्या गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भाच्या (Marathwada and Vidarbha) काही महत्त्वाच्या भागांमध्ये आणि घाटमाथ्यावर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मराठवाडा ते बिहार दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भाच्या (Marathwada and Vidarbha) काही महत्त्वाच्या भागांमध्ये आणि घाटमाथ्यावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचं वातावरण (Weather) तयार झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम हवामानावर होतो. यामुळे थंडी आणि पाऊस असं वातावरण सध्या सुरू झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांवरही या अवकाळी पावसाचं सावट आहे. कोरड्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे किमान तापमानात घट होवून उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात (Weather) वेगाने बदल होताना दिसत आहे. राज्यातही फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार ५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पावसामुळे शेतीला धोका पोहोचण्याची शक्यता अधिक आहे. सध्या आंबा आणि काजू पिकासाठी वातावरण आहे. मात्र, पाऊस पडला तर या पिकाला मोठा धोका निर्माण होणार आहे. आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.