आ. सोळंकेनी केला ‘त्या’ भेटीचा खुलासा…. मतदारसंघात ५६८ कोटींचे बजेट

माजलगाव: दि.३१(प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपुर्वी बीड जिल्ह्यातील एका आमदाराचे नाव केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितिन गडकरी यांनी केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कमिशन मागण्याच्या मुद्द्यात असल्याची चर्चा होत होती. आज आ.प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदरील प्रकरणी गडकरी यांनी २०१८ मध्येच तक्रार केलेली असून याप्रकरणाशी काही संबंध नसल्याचे सांगत मतदारसंघात ५६८ कोटींचे बजेट मंजूर करत लवकरच कामाची सुरुवात होणार असल्याची माहिती दिली.

माजलगाव (Majalgoan) मतदारसंघात जवळपास ५६८ कोटी रूपयांचे बजेट मंजुर असुन त्याच्या प्रत्यक्ष कामाची सुरूवात एप्रिल महिन्यात होणार आहे. या माध्यमातुन गावा – गावांचा चेहरा – मोहरा बदलत विकासाची गंगा मतदारसंघात वाहणार आहे. १९८६ पासुन भुसंपादनाचे अनेक प्रकरणे प्रलंबीत असुन त्याचा शासन स्तरावरून निपटारा होण्यासाठी शासन कटीबध्द आहे. येत्या काही दिवसांत ही प्रकरणे नव्या नियमानुसार निकाली काढण्यात येणार असल्याचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी यावेळी सांगीतले. मंजूर कामात माजलगाव (Majalgoan) तालुक्यात ४५ हजार कामे असुन त्याचे बजेट ३८५ कोटी रूपये आहे. धारूर (Dharur) तालुक्यामध्येे ९६ कोटी ४१ लाख रूपयांची १५५९ कामे आहेत तर वडवणी मध्ये ८० कामे आहेत. पुढे बोलताना विकासकामांसाठी नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. माजलगाव मतदारसंघात मागील काही दिवसांपूर्वी दोन राष्ट्रीय महामार्गाची कामे झालेली आहेत. परंतु त्यातील काही कामे अद्यापही पुर्ण झालेली नाहीत. या कामाला गती मिळावी हे काम पूर्णत्वास जावे यासाठी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेशी भेट घेउन या कामाबाबत सकारात्मक चर्चा केली. मी आमदार होण्यापूर्वी नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) कमीशन मागणाऱ्या खासदार, आमदार, मंत्री यांची तक्रार २०१८ मध्येच केलेली आहे. मी केवळ मतदारसंघातील प्रलंबीत कामासाठी गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे गडकरी यांनी केलेल्या तक्रारीशी माझा काहीही संबंध नसल्याचे आ.प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी सांगितले. यावेळी मुंबई बाजार समितीचे सभापती आशोक डक, जयदत्त नरवडे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!