धारुर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडत ४ फेब्रुवारीला

किल्लेधारूर दि.१(वार्ताहर) तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) सरपंच (Sarpanch) पदासाठी दि.४ रोजी होत असून यात सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाकडून तहसीलदार वंदना शिडोळकर व निवडणूक (Election) विभाग प्रमुख नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले आहे.
सन २०२० ते २०२५ या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच (Sarpanch) पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी व महिलांसाठी आरक्षित करुन संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. त्या अनुशंगाने धारुर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे ग्रामपंचायत (Gram Panchayat) निहाय आरक्षण निश्चिती संदर्भिय आदेनानुसार सोडत दि.४ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात होणार आहे. या सोडतीसाठी तालुक्यातील जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार वंदना शिडोळकर व निवडणूक (Election) विभाग प्रमुख नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले आहे.