कोरोंना विशेष

लातूरमध्ये एकाच वस्तीगृहातील ४० विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह

लातूरः दि.२३- लातूर (Latur) शहरात एकाच वसतीगृहातील ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यावर कोरोनाचे (Corona) संकट पुन्हा एकदा ओढावले असताना शाळा, महाविद्यालय व वस्तीगृहे हॉटस्पॉट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. लातूरमध्ये आढळून आलेल्या एकाच वस्तीगृहातील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

(Corona positive 40 students from the same hostel in Latur)

लातूरमधील एमआयडीसी परिसरातील जेएसपीएम संस्थेच्या वस्तीगृहात हा प्रकार घडला आहे. वसतीगृहातील ४० विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लातूर महापालिकेने ४२० विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. या तपासणीचे रिपोर्ट आता समोर आले असून ४० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना १२ नं. पाटी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात सुरु झालेल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी लातूर सारख्या शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या शहरात वस्तीगृहे भरत आहेत. मात्र सद्यस्थितीत सदरील वस्तीगृहे हॉटस्पॉट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. एका वस्तीगृहात तब्बल ४० विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!