बीड जिल्ह्याची आजची कोरोना स्थिती…तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२६ फेब्रुवारी- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ८७२ प्राप्त अहवाला पैकी फक्त ५१ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ८२१ जन निगेटिव्ह आली आहेत आज सर्वाधिक कोरोना रुग्ण बीड तालुक्यात आढळले. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

(Today’s corona status of Beed district … see taluka wise statistics …)

१. बीड- २२             ७.माजलगाव-४
२. अंबाजोगाई-९      ८.परळी-२
३. आष्टी-५               ९.पाटोदा-१
४. धारुर-०              १०.शिरुर-३
५. गेवराई-१             ११.वडवणी-०
६. केज-४

वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.२६ शुक्रवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाने कोरोना (corona) संशयितांच्या चाचण्या वाढवण्यावर भर दिला असून आज तब्बल ८७२ संशयितांचा अहवाल प्राप्त झाला आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना (corona) रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. औरंगाबाद, अहमदनगर, पुण्यासह मुंबईत परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मुंबईच्या धारावी पुन्हा हॉटस्पॉट होण्याची चिन्हे दिसत असून आरोग्य प्रशासनाने सतर्कता बाळगत उपाययोजना सुरु केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!