राज्यात रविवारची संख्याही चिंताजनक… कोरोना संकटात राजकीय वातावरण तापले.

मुंबई : दि.१ मार्च- राज्यात कोरोना संकट घोंगावत असताना सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide case) राजकीय वातावरण तापले आहे. यातच आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्याची कोरोना (corona) स्थितीही चिंताजनक दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनूसार रविवारी सलग पाचव्या दिवशी ८,२९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ६२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,५५,०७० झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार १५४ झाला आहे. राज्यात सध्या ७७ हजार ८ रुग्ण उपचाराधीन आहेत.
(Sunday’s numbers in the state are also worrying … The Corona crisis heated up the political atmosphere.)
गेल्या २० दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे. यातच गेल्या आठवड्यात नवीन कोरोनाने (corona) उचल घेत राज्याची चिंता वाढवली. कोरोना परिस्थिती चिंताजनक होत असतानाही पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे (Pooja Chavan suicide case) मोठे राजकारण करण्यात आले. काल रविवारी या प्रकरणातून मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त येत असताना कोरोना बाबत राज्याची चिंता वाढवणारी बातमी आली आहे.
रविवारी सलग पाचव्या दिवशी आकडा आठ हजारावरच असल्याचे दिसून आले. काल ८,२९३ नवीन रुग्ण आढळले तर ६२ कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात ३,७५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण २०,२४,७०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९५ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.४२ टक्के इतका आहे. नोंद झालेल्या एकूण ६२ मृत्यूंपैकी २९ मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर १७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६२,८४,६१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२३ टक्के नमुने कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले आहेत.