बीडमध्ये पून्हा लाच प्रकरणी अधिकारी जाळ्यात… जिल्हा लाचखोरीने बरबटला

बीड दि.१ मार्च (प्रतिनिधी)- पंधरा दिवसांपुर्वी माजलगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यास ६५ हजाराची लाच घेताना जालना येथील लाचलुचपत पथकाने पकडल्याची घटना ताजी असताना आज बीडमध्ये पुन्हा एक अधिकारी २० हजाराची लाच घेताना लाचलूचपत विभागाच्या (Anti-Corruption Bureau) जाळ्यात अडकल्याची घटना घडली.
(In Beed again, the officer was caught in a bribery case … The district was ruined by bribery)
बीड येथील लेखा परिक्षण विभागात सहाय्यक संचालक पदावर असलेल्या किरण घोटकर यांच्या वर कारवाई झाल्याची माहिती आहे. एका प्रकलाणासाठी ठरलेली २० हजाराची लाच स्विकारताना बीड येथील लाचलुचपत विभागाच्या (Anti-Corruption Bureau) पोलीस उपाधिक्षक बाळकृष्ण हानगुडे यांच्या पथकाने ही कारवाई आज दि.१ मार्च रोजी रात्री केली आहे. सदरील प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
गेल्या महिनाभरात जिल्ह्यात लाचलुचपत विभागाकडून अनेक ठिकाणी कारवाया करण्यात आलेल्या आहेत. यात वडवणी, केज, आष्टी व माजलगाव तालुक्यातील अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून कारवाया होत असतानाही याला वचक बसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सतत होत असलेल्या कारवायातून जिल्हा भ्रष्ट अधिकाऱ्यानी बरबटला असल्याची चर्चा होत आहे.