देवेंद्र फडणवीससह भाजपच्या 7 नेत्यांविरुध्द तक्रार; पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

वाशिम : दि.4 मार्च- पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide case) विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह चित्रा वाघ (Chitra Wagh), आशिष शेलार व इतर अशा भाजपच्या ७ नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत वाशिम शहर व मानोरा पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून या दोन्ही तक्रारी चौकशीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
(Complaint against 7 BJP leaders including Devendra Fadnavis; Puja Chavan suicide case)
गेल्या महिनाभर राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan suicide case) प्रकरणी राजकीय रुप देत भाजपने रणकंदन माजवले होते. माध्यमांनी या प्रकरणाला विशेष प्रसिध्दी देत ब्रेकिंग न्यूज केली होती. यामुळे मृत मुलीच्या कुटुंबासह बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अखिल बंजारा परिषदेचे अध्यक्ष श्याम राठोड यांनी वाशिम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चित्रा वाघ (Chitra Wagh), सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर, आशिष शेलार, शांता चव्हाण यांच्यासह माध्यमावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबासह बंजारा समाजाची मागील अनेक दिवसांपासून बदनामी सुरू आहे. यामध्ये भाजपनेते आणि माध्यमं रोज बदनामी करीत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली. यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे तक्रारकर्ते श्याम राठोड यांनी सांगितले.
दुसरी तक्रार राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हा सचिव नेमीचंद भासू चव्हाण यांनी वाशिम शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. यापुर्वीच पुजा चव्हाण हिच्या कुटूंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे बदनामी थांबवण्याची मागणी करत परळी पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे. पुजा चव्हाणची आजी म्हणून माध्यमात दिसलेली शांताबाई चव्हाण हिचे नावही तक्रारीत समाविष्ट आहे. शांताबाईनी तर पुजाच्या कुटूंबियांनी 5 कोटी घेतल्याचा दावाही केला होता. यामुळे आता हे प्रकरण वेगळ्या वळणावर आले आहे.