पूजा चव्हाणचा लॅपटॉप चोरल्याची बीड पोलिसाकडे तक्रार…

बीड दि.4 मार्च – पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणामध्ये (Pooja Chavan suicide case) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका नगरसेवकाचे नाव समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वानवडी भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप (Laptop) गायब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीता चव्हाण यांनी अशी तक्रार बीड पोलिसांकडे दिली आहे. यामुळे या प्रकरणात नवीन ट्विस्ट आले आहे.

(Pooja Chavan’s laptop stolen, complaint lodged with Beed police …)

शिवसेनेच्या (Shiv Sena) बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीता चव्हाण यांनी सदर तक्रारीत म्हटले आहे की, धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप चोरुन त्यातील माहिती चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना दिली आहे. नगरसेवकाने या संपूर्ण प्रकरणाचे महत्त्वाचे पुरावे आणि माहिती असलेला लॅपटॉप चोरला. त्यामुळे आता पूजा चव्हाण प्रकरणातील (Pooja Chavan suicide case) गूढ आणखीनच वाढले आहे. पूजा चव्हाण, संजय राठोड यांच्या निवडणुकीचं कॅम्पेन करत होती, अशी माहिती मिळालीय. आणि त्याच प्रकारचे व्हिडीओही पूजाच्या लॅपटॉपमधूनच समोर आलेत. संजय राठोड मतदारसंघात फिरत असल्याचे, नागरिकांशी संवाद साधत असल्याचे फोटो आणि व्हिज्युवल्स घेऊन राठोडांचे व्हिडीओ तयार करण्यात आलेत.

पूजा चव्हाणने पुण्यातील वानवडी परिसरातील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. याच इमारती समोर नगरसेवक धनराज घोगरे यांचे घर आहे. पूजाला दवाखान्यात दाखल करण्यात आल्यानंतर तिचा लॅपटॉप (Laptop) गायब झाला. दरम्यान भाजप नगरसेवकानेच पूजाचा लॅपटॉप गायब केला असल्याचा आरोप आहे.

भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ यांचेही तक्रारीत नाव
धनराज घोगरे या नगरसेवकाने लॅपटॉप मधील माहिती चोरून ती चित्रा वाघ दिली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या विरोधात देखील संगीता चव्हाणांकडून तक्रार देण्यात आली आहे. या लॅपटॉपमधून अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. पुणे पोलिसांनी देखील पूजाचा लॅपटॉप चोरीला गेल्याचा आणि आपण त्याचा शोध घेत असल्याची माहिती दिली आहे.

धनराज घोगरे यांनी आरोप फेटाळले…
या पार्श्वभूमीवर धनराज घोगरे यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारपरिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. पूजा चव्हाण इमारतीवरून खाली पडली तेव्हा मी त्याठिकाणी केवळ माणुसकीच्या नात्याने गेलो होतो. मी तिला उचलून रिक्षात ठेवले. त्यावेळी अरूण राठोड आणि विलास चव्हाण हे दोघेही त्याठिकाणी हजर होते. पूजाला उपचार मिळणे, ही माझी प्राथमिकता होती. मी पूजाच्या फ्लॅटमध्ये जाऊन तिच्या कोणत्याही वस्तूला हात लावलेला नाही, असे धनराज घोगरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!