कोरोंना विशेष

राज्यात गुरुवारची संख्याही ९ हजार… कोरोना अपडेट

मुंबई : दि.5 मार्च- राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढावलेले आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत मोठी वाढ झाली आहे. आकडेवारी वाढल्याने राज्य व केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत सरकारने दिलेले आहे.

(Thursday’s number in the state is also 9 thousand … Corona update)

गुरुवारी राज्यात तब्बल ८ हजार ९९८ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, नवीन बाधित आणि कोरोनातून मुक्त झालेल्या संख्येतील फरक वाढत चालला आहे. ऍक्टिव्ह (Active) रुग्णांची संख्या वाढून ८५ हजारच्या पुढे गेली आहे.

दरम्यान, गुरुवारी ६ हजार १३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक ऍक्टिव्ह (Active) रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. १७ हजार ५२२ इतके रुग्ण हे पुणे जिल्ह्यात तर राज्यात ८५ हजार १४४ इतकी ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झाली आहे. आतापर्यंत एकूण २० लाख ४९ हजार ४८४ कोरोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.६६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत कोरोना (corona) संसर्गाने राज्यात ५२ हजार ३४० जणांचा बळी घेतला आहे. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर २.३९ टक्के एवढा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा (Corona Positive) आकडा हा अधिक वाढत चालल्याने नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागातर्फे केलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!