पात्रुडमध्ये जागेच्या वादातून लहान भावाकडून मोठ्या भावाचा खुन

माजलगाव दि.8 मार्च- माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे अनेक दिवसापासून जागेच्या वादावरुन दोन भावांमध्ये वाद होत होता. त्या वादाचे रूपांतर सोमवारी मोठ्या भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून (Murder) केल्याची घटना सात वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाली असून आरोपीस ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पात्रुड गावात एकच खळबळ उडाली.
(Murder of elder brother by younger brother in space dispute; Incidents in Patrud)
माजलगाव पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पात्रुड येथे प्लॉटच्या वादावरून दोन भावामध्ये अनेक दिवसापासून भांडण होते. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोघा भावात घरी जोरदार भांडण झाले. दोघा भावांच्या हातात धारदार शस्त्र असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या भांडणात शेख अर्शद शेख शकील या छोट्या भावाने शेख इर्शाद शेख शकील याचा धारदार शस्त्राने वार करून खून (Murder) केल्याची घटना घडली.
विशेष म्हणजे या भांडणात आई एका मुलाच्या बाजूने तर वडील दुसऱ्या मुलाच्या बाजूने असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी ग्रामीण पोलीस तात्काळ हजर झाले. घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून तणाव निर्माण झाला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस (Police) अधिकारी सुरेश पाटील यांनी भेट दिली. आरोपीस पोलीसांना ताब्यात घेतले असल्याचे माहिती पोलिसांनी दिली.