बीड डेंजर झोनमध्ये; देशातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण महाराष्ट्रात

मुंबई दि.18 मार्च – राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूचा (Corona virus) संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न होत आहेत. परंतू कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ सुरुच आहे. त्यात आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी तब्बल 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत. सदरील बाब केंद्रीय आरोग्य खात्याने (Health department) चिंतेची असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. महाराष्ट्रातील चिंताजनक परिस्थिती असलेल्या जिल्ह्यात बीडचाही (Beed) समावेश आहे.
(In the Beed Danger Zone; Maharashtra accounts for 60% of the total patients in the country)
काल देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. या बैठकीत देशात वाढत असलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण (Corona Positive) संख्येबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी तब्बल 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत. राज्यातील पॉझिटिव्हिटीचा दर 16 टक्क्यांपेक्षा जास्त असून, ही चिंतेची बाब असल्याचं केंद्रीय आरोग्य खात्याचे म्हणने आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेने सरकारने घालून दिलेले नियम पाळण्याची आणि काळजी घेण्याची नितांत गरजेचे बनले आहे.
आरोग्य विभागाने (Health department) दिलेल्या माहिती प्रमाणे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती आहे. ज्यात नांदेड, नंदूरबार, बीड (Beed), धुळे, नाशिक, जळगाव, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे देशातील कोरोना व्हायरसचा (Corona virus) संसर्ग वेगात होणाऱ्या टॉप टेन जिल्ह्यात महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.
काल दिवसभरात 23 हजारावर रुग्ण…
महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात 23 हजार 179 नवे कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आले आहेत. तर 9 हजार 138 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 84 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या राज्यात 1 लाख 52 हजार 760 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आढावा घेतला तर राज्यात आतापर्यंत 23 लाख 70 हजार 507 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 21 लाख 63 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 53 हजार 80 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.