कोरोंना विशेष

शनिवारी राज्यात आढळले तब्बल 27 हजार 126 नवीन कोरोना संक्रमित

मुंबई दि.21 मार्च – महाराष्ट्रात (Maharashtra) शनिवारी कोरोना बाधित रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळाले. तब्बल 27 हजार 126 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचे निदान शनिवारी झाले. मागील वर्षी कडक लॉकडाऊन असताना ज्या प्रकारे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत होती. तिच वाढ सध्या 2021 च्या मार्च महिन्यात होत असल्यामुळे प्रशासनासह सामान्य नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत.

(A staggering 27,126 new corona infections were found in the state on Saturday)

महाराष्ट्रातील (Maharashtra) मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर सारख्या शहरांमध्ये तर रोज नवीन उच्चांक गाठला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वांनाच कडक निर्बंधांना सामोरे जावे लागणाची शक्यता आहे. शनिवारी 13,588 रुग्ण बरे होऊन घरी गेले त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 22,03,553 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.97% एवढे झाले आहे.

शनिवारी 92 रुग्णांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.18% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,82,18,001 प्रयोगशाळा नमनुयाांपैकी 24,49,147 (13.44 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,18,408 व्यक्ती होम क्वॉरांटाईनमध्ये आहेत तर 7,953 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

पुणे जिल्ह्यात 5473 कोरोना रुग्णांची नोंद तर 27 रुग्णांचा मृत्यू. 23483 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर इतक्या व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्यात. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळलेली सर्वाधिक वाढ आहे. पुणे जिल्ह्यात रोजची संख्या पाच हजारच्या पुढे गेली असली तरी अद्याप कोणतेही कडक निर्बंध लादण्यात आलेले नाही. मात्र, हे असच सुरु राहिलं तर येणाऱ्या काळात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!