बीड जिल्ह्यात विहिरीत आढळला मृत अवस्थेत बिबट्या.

बीड दि.24 मार्च – बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात महेंद्रवाडी शिवारात एका विहिरात आज एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. दोन दिवसांपुर्वी या भागातील बीड कल्याण महामार्गावर काही वाटसरुनी बिबट्या (Leopard) पाहिल्याची चर्चा होती. यानंतर आज विहिरीत आढळलेला बिबट्या तोच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(A dead leopard was found in a well in Beed district.)

नोव्हेंबर व डिसेंबर 2020 मध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी व पाटोदा तालुक्यासह अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याने धुमाकुळ घातला होता. अखेर सोलापुर वनविभागातील मोहोळ वनपरिक्षेत्रातील मौजे लिंबेवाडी ता . करमाळा आदि परिसरात धुमाकुळ घालणाऱ्या व मानवी जिवितास धोकादायक ठरलेल्या बिबटयाला (Leopard) ठार करण्यात आले होते. सहा नर बळी घेतलेल्या त्या बिबट्यास करमाळा तालुक्यातील वांगी येथे शार्प शुटरने त्याचा वेध घेवून ठार केल्यानंतर वनविभागाकडून (Forest Department) माहिती देण्यात आली होती.

यानंतर महिनाभरापुर्वीही बिबट्या (Leopard) आढळून आल्याने आष्टी तालुक्यात दहशत माजली होती. आज पाटोदा तालुक्यात महेंद्रवाडीत एका विहिरीत मृतावस्थेत बिबट्या इढळल्याने खळबळ माजली. सदरील बिबट्या याभागात कसा पोहोचला व त्याचा मृत्यू कसा झाला या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. वनविभागाला (Forest Department) सदरील घटना ग्रामस्थांनी कळवली असून तपास सुरु आहे. काल परवा याभागात बिबट्या दिसल्याची चर्चा होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!