बीड जिल्ह्यात आज दिलासा; कोरोना बाधितांचा आकडा 90 ने उतरला.

बीड दि.28 मार्च- बीड जिल्ह्यात आज दिलासादायक चित्र आहे. काल 375 असलेली कोरोना बाधितांची संख्या आज 284 वर आली आहे. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2983 प्राप्त अहवाला पैकी 375 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 2699 जण निगेटिव्ह आली आहेत. आज तेविसाव्या दिवशी बीड तालुक्यात 59 दिलासा देणारी कोरोना पॉझिटीव्ह संख्या आहे. धारुरमध्ये 8 तर केजमध्ये 13 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले.
(Relief in Beed district today; The number of corona victims dropped to 90.)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-59, अंबाजोगाई-73, आष्टी-30, धारुर-8, गेवराई-24, केज-13, माजलगाव-32, परळी-37, पाटोदा-17, शिरुर-6, वडवणी-4
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.28 रविवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 375 वरुन 284 वर आली आहे. परवा शुक्रवारी हि संख्या 383 होती. कालपेक्षा जवळपास 91 ने संख्या उतरली असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज तिसरा दिवस आहे.
दरम्यान, शनिवारी राज्यात दिवसभरात 37 हजारावर नवीन कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण महाराष्ट्रात आढळली आहेत. तर देशात 62 हजारावर कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळली आहेत. राज्य शासनाने आजपासून नवीन नियमावली जाहिर करत रात्रीची संचारबंदी जाहिर केली आहे.