‘भेटीतील चर्चा सार्वजनिक करता येत नाही’ पवार यांच्या भेटीवर अमित शहा यांचे सुचक वक्तव्य

नवी दिल्ली दि.28 मार्च- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) काल अहमदाबादमध्ये गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना भेटल्याची चर्चा आहे. ही भेट झाल्याचे शहा यांनीही नाकारलेले नाही. भेटीबाबत त्यांना विचारले असता ‘प्रत्येक भेटीतील चर्चा सार्वजनिक करता येत नाही’, असे म्हणत शहा यांनी या भेटीबाबतचे गुढ कायम ठेवले. या भेटीवरून राज्यात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. तिकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी सदरील भेटीचे वृत्त हि केवळ अफवा असुन खोडसाळपणातून चर्चा होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

(Amit Shah’s suggestive statement on Pawar’s visit)

मागील काही दिवसांपासून सचिव वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब, गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांचा गोपनीय अहवाल आदी मुद्यांनी महाविकास आघाडी सरकार घेरले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर भाजपाकडून (BJP) सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. या सर्व प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बदली रॅकेटचा अहवाल थेट केंद्र गृहसचिवांना देत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. भाजप (BJP) नेत्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली. या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी मान्य केले आहे. याबाबत काँग्रेसमधील काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही देशमुख यांच्यासह सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे.

त्यातच काल शरद पवार (Sharad Pawar) व प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी अहमदाबादमध्ये अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. आज शहा यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही भेट झाल्याचे नाकारले नाही. पत्रकारांनी त्यांना या भेटीबाबत विचारले असता त्यांनी `प्रत्येक भेटीतील चर्चा सार्वजनिक करता येत नाही,` असे म्हणत अधिक बोलायचे टाळले. पण शहा यांनी थेट शब्दांत ही भेट झाली नसल्याचेही अमान्य केले नाही.

सामनामधून खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या टिकेनंतर महाविकास आघाडीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. याविषयी देशमुख यांनी बोलणे टाळले असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वकाही व्यवस्थित सुरु असताना कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये अशी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पवार शाहा भेटीवर बोलताना हे राजकारण नवीन पिढीतील राजकारण्यांना कळणार नाही असे सांगितले. सध्या मात्र याभेटीनंतर चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!