आता बँक कर्मचारी व खाजगी कर्मचाऱ्यांना ॲन्टीजन चाचणी बंधनकारक … बीड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीड दि.30 मार्च – बीड (Beed) जिल्ह्यात कोरोनाचा (corona) वाढता प्रकोप पाहता जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी आज नवीन आदेश काढला आहे. आठवडे बाजार बंदी, व्यापाऱ्यांची ॲन्टीजन तपासणी व दहा दिवसांच्या लॉकडाऊन नंतर आता जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी बँक कर्मचारी व अधिकारी तसेच खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची ॲन्टीजन तपासणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.
(Antigen testing is now mandatory for bank employees and private employees … Beed Collector’s order)
गेल्या महिन्यापासून बीड (Beed) जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना (corona) प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या बैठका घेवून ॲन्टीजन (Antigen) तपासण्या करण्याचे आवाहन केले होते. यासाठी 1 मार्च ते 5 मार्च स्वतंत्र मोहिम राबवण्यात आली. यानंतरही कोरोना प्रादुर्भाव वाढतच असल्याने जिल्ह्यात आठवडे बाजार बंदी व नंतर सार्वजनिक जीवनावर परिणाम करणारे कडक निर्बंध लावण्यात आली.
मात्र दिवसेंदिवस जिल्ह्याची कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढतच गेली. अखेर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि.26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला. काल लॉकडाऊन (lockdown) मध्ये अंशतः बदल करत सर्व व्यापाऱ्यांना आस्थापना सुरु ठेवण्याचे आदेश देत शिथिलता वेळेत 7 ते 1 असा बदल करुन दिलासा देण्यात आला. आज स्वतंत्र आदेश काढत जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी बँक कर्मचारी (Bank employees) व अधिकारी तसेच खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची दि.2 एप्रिलपर्यंत ॲन्टीजन (Antigen) तपासणी बंधनकारक (mandatory) करणारा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी घेतला आहे.
दि.5 एप्रिलनंतर सर्व बँक कर्मचाऱ्यांची (Bank employees) ॲन्टीजन चाचणी शिवाय कामावर येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे संबंधित शाखा व्यवस्थापकानी घ्यावी असे आदेशात म्हटले आहे. नसता कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.