आज बीड जिल्ह्यात 1145 कोरोना बाधित; जिल्ह्यात आकडा वाढण्याची शृंखला सुरुच.

बीड दि.22 एप्रिल- बीड (Beed) जिल्ह्यातील 4690 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1145 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3545 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी आज रात्री पासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

(1145 corona affected in Beed district today; The number continues to grow in the district.)

आज सेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 226 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज  अंबाजोगाई तालुक्यात 205, आष्टी तालुक्यात 138 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 43 तर केजमध्ये 119 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-226, अंबाजोगाई-205, आष्टी-138, धारुर-43, गेवराई-116, केज-119, माजलगाव-65, परळी-77, पाटोदा-91, शिरुर-33, वडवणी-32 अशी आहे.

कोविड-19 (covid-19) चा उद्रेक जिल्ह्यातच नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात वाढलेला आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दररोज हजारावर येच आहे. राज्य सरकारने आज रात्री पासून नवीन निर्बंध जाहिर केले असून 1 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात 21 एप्रिल बुधवारी 67 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनावाढीचा दर चढत्या आलेखात आहेच, पण चिंतेची बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 52 हजारावर स्थिर आहे. नवीन आढळलेले रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यात तफावत कायम असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. हीच राज्यासाठी मोठी चिंतेची बाब आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं तर रुग्णालयात बेड उपलब्ध होउन नव्या रुग्णांवर उपचार करण सोपं होऊ शकत, पण गेला महिनाभर ही परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!