धारुर शहरात 30 खाटांचे डेडिकेटेड कोविड सेंटर मंजूर; जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचे आदेश

किल्लेधारूर दि.23 एप्रिल – तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. येथील कोविड केअर सेंटरवर (Covid care center) सध्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या वाढत असलेले रुग्णांची संख्या लक्षात घेवून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी धारूर येथील आडस रोड लगत असलेल्या स्पर्श रुग्णालयास कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी 30 बेडच्या डेडिकेटेड कोविड सेंटरला (Dedicated Covid Center) परवानगी दिली आहे.

(30-bed dedicated covid center sanctioned in Dharur city; Order of Collector Ravindra Jagtap)

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी शुक्रवारी हे काढले आहेत. दि.23 एप्रिल पासून ही परवानगी देण्यात आली असून परवानगी देताना कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णास डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार नसल्याचेही आदेशामध्ये म्हटले आहे.

बीड जिल्ह्यात मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना विषाणूचे संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात बंद करण्यात आलेली सर्व कोविड केअर सेंटर दि.30 मार्चपासून सुरु करण्यात आली आहेत. दि.2 एप्रिलपासून धारुर येथील कोविड केअर सेंटर (Covid care center) सुरु करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र वाढती रुग्ण संख्या पाहता शहरात 100 खाटांचे दोन व 60 खाटांचे एक असे तीन कोविड सेंटर सुरु करण्यात आलेले आहेत.

दोन दिवसांपुर्वीच येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात 100 खाटांचे तिसरे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. या कोविड सेंटरची सर्व जबाबदारी भाजपा नेते रमेश आडसकर यांनी घेतली. आज धारुर शहरात स्पर्ष हॉस्पिटल येथे  नवीन खाजगी डेडिकेटेड कोविड केअर सेंटर (Dedicated Covid Center) मंजूर करण्यात आले. यामुळे शहरात अस्वस्थ 30 रुग्णांची सोय या कोविड सेंटरमध्ये होणार आहे. कोविड केअर सेंटरचे संचालक डॉ. परवेज शेख यांनी सर्व सुविधायुक्त सेवा देणार असल्याची माहिती दिली. येथे डॉ सचिन दौलतराव चाटे (एम डी), डॉ अजय भारत बुदगुडे पाटील(एम डी ), डॉ श्रीकांत सुधाकर ढाकणे (एम बी बी एस), डॉ सुप्रिया शेळके (बी ए एम एस), डॉ तय्याबा शेख़ (बी ए एम एस), डॉ परवेज़ शेख़ (BHMS) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य 16 प्रशिक्षित कर्मचारी सेवा देणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!