साळेगाव प्रकरणाचा तासाभरात झाला उलगडा; जावायानेच केला सासूचा खुन.

केज दि.25 एप्रिल – केज तालुक्यातील शहरापासून अवघ्या सात ते आठ किमी अंतरावर असलेल्या खामगाव सांगोला राष्ट्रीय महामार्गावरील साळेगाव नजीक एका महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने खळबळ उडाली होती. सदरील प्रकरणात जावायानेच सासूचा खुन (Murder) केल्याचे उघड झाले असून केज पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

(The Salegaon case was solved within an hour; Javanese killed his mother-in-law.)

साळेगाव ता.केज नजीक असलेल्या कळंब कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाजवळ एका अंदाजे 35 वर्षीय महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळून आला आहे. सदरील महिलेच्या तोंडावर तीक्ष्ण हत्याराचे वार दिसत असून बाजूलाच मिरचीची पूड तसेच एक घड्याळ पडल्याचे निदर्शनास आले. तर याच परिसरात एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले असून त्याला उपचारासाठी हलवण्यात आले होते.

दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनास्थळी केज पोलिसांनी (Police) धाव घेतली. भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात उलटसूलट चर्चा होती. घटनास्थळी एक जखमी आढळून आल्याने पोलिस (Police) त्या व्यक्तीचा या घटनेशी संबंध आहे का? याचा शोध घेवून लवकरच तपास लागण्याची शक्यता वर्तवली जात असताना अवघ्या दोन तासात खुनाचा छडा लागला.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा धायगुडा येथील सुलोचना माणिक धायगुडे या आपला पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे याच्यासह रविवारी सकाळी साळेगाव येथे जावाई अमोल वैजेनाथ इंगळे याला भेटण्यासाठी आल्या होत्या. भेटून परत जात असताना सुलोचना व त्यांचा जावाई अमोल यांच्यात बाचाबाची झाली. यात अमोल यांनी सासु सुलोचना यांच्या तोंडावर मिरची पुड टाकून धारदार शस्त्राने चेहऱ्यावर, मानेवर, हातावर वार केले. यात पुतण्या अंकुश गंभीर जखमी झाला.

सासु व जावायात झालेल्या वादातून जावायाने सासूचा खुन (Murder) केल्याचे उघड झाले. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत, एपीआय संतोष मिसळे यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी असलेला मयतेचा पुतण्या अंकुश धायगुडे यांच्या खबरेवरुन केज पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!