बीड जिल्ह्यात पहा आजची कोरोनास्थिती; धारुर, केज, वडवणीसह पहा तालुकानिहाय परिस्थिती.

बीड दि.26 एप्रिल- बीड (Beed) जिल्ह्यातील 3557 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1086 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2471 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग दिवसेंदिवस वाढतच असून मृतांची संख्याही वाढली आहे.

(See today’s corona status in Beed district; See taluka wise situation with Dharur, Kaij, Vadvani.)

आज एकेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 246 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 203, आष्टी तालुक्यात 98 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 62 तर केजमध्ये 109 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-246, अंबाजोगाई-203, आष्टी-98, धारुर-62, गेवराई-99, केज-109, माजलगाव-49, परळी-106, पाटोदा-41, शिरुर-21, वडवणी-52 अशी आहे.

कोविड-19 (covid-19) च्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक अख्ख्या देशभर वाढलेला आहे. राज्यापाठोपाठ बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दररोज हजारावर येत आहे. हजाराच्या आत असणारी आकडेवारी गेली तीन दिवस बाराशे ओलांडत आहे. दिवसेंदिवस मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढत आहे. काल जिल्ह्यात 20 मृत्यूंची नोंद झाली.

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) तब्बल 66 हजार 191 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, आज 832 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर, मुंबई आणि पुण्यातुन काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर आलं आहे. रुग्णवाढीच्या संख्येपेक्षा तिकडे बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!