महाराष्ट्रात 15 मे पर्यंत कडक निर्बंध … पहा काय आहेत मार्गदर्शक सुचना.

मुंबई दि.28 एप्रिल – कोरोना रुग्णांच्या (Corona patients) संख्येत चढउतार होत असले तरी राज्यातले कोरोना संकट अद्याप कायम आहे. राज्यात 6 लाख 72 हजारांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामुळे महाराष्ट्रात 15 मे पर्यंत कडक निर्बंध (Strict restrictions) राहणार आहेत. सामान्यांना रेल्वे, बस ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यास मनाई असणार आहे. 14 एप्रिल पासून लागलेले लॉकडाऊन (lockdown) 1 मे च्या सकाळी 7 पर्यंत आहे. यात वाढ करुन हा लॉकडाऊन (lockdown) 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.

(Strict restrictions in Maharashtra till May 15 … see what are the guidelines.)

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांनाच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची परवानगी आहे. इतरांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास मनाई आहे.

खासगी वाहतुकीसाठी चालक आणि प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के एवढ्या प्रवाशांना परवानगी. रिक्षात चालक आणि दोन प्रवासी यांनाच परवानगी आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास दहा हजार रुपयांचा दंड होणार आहे. बसमध्ये उभ्याने प्रवासाला मनाई आहे तसेच खासगी बसमध्ये 50 टक्के प्रवासी क्षमतेलाच परवानगी आहे. प्रवासात ओळखपत्र बाळगण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

किराणा मालाची विक्री, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री, भाजीपाला विक्री, फळेविक्री तसेच अंडी, मटण, मासे चिकन यांची विक्री तसेच कृषी संबंधित उत्पादनांची विक्री आणि सेवा, पशूखाद्य विक्री, सर्व प्रकारच्या इंधनची विक्री सकाळी 7 ते 11 या वेळेत होणार आहे.

पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा, मालवाहक वाहने यांच्यासाठीची इंधन विक्री नियमित वेळेनुसार होईल. हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डीलिव्हरी रात्री आठपर्यंत सुरू राहील. धार्मिक स्थळे, आठवडी बाजार, भाजीपाला तसेच फळे-फुले यांचे बाजार बंद राहतील. द्वार विक्री अथवा वितरणास परवानगी आहे.

ऑनलाइन शॉपिंग सुरू राहील आणि होम डीलिव्हरी करता येईल. वाइन शॉप बंद असली तरी दारूच्या होम डीलिव्हरीला परवानगी आहे. सरकारी, निमसरकारी आणि खासगी शिक्षण संस्था तसेच कोचिंग क्लास बंद राहतील.

सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत. स्टेडियम आणि मैदाने प्रेक्षकांसाठी बंद तसेच व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी चालणे वा धावणे वा इतर व्यायाम बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद राहणार आहेत.

वर्क फ्रॉम होम सुरू राहील. वित्तीय कार्यालये सुरू पण इतर खासगी कार्यालये बंद राहतील. सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, मॉल बंद राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक , धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम यांना बंदी आहे.

दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्ण (Corona patients) संख्या पाहता कडक लॉकडाऊनचा (Maharashtra lockdown) निर्णय घेण्यात आला होता. राज्यात लॉकडाऊनचा समाधानकारक परिणाम दिसत असल्यामुळे बहुतेक मंत्र्यांनी पुढील पंधरा दिवस लॉकडाऊन सुरु ठेवण्याची शिफारस केली. यामुळे 15 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन (Maharashtra lockdown) वाढवण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!