राष्ट्रवादीचा पंढरपूरात पराभव मात्र केरळात लाभ; पंढरपूरात भाजपाला ‘समाधान’

पंढरपूर दि.2 मे – देशात आज 5 राज्यांच्या निकालांची जोरदार चर्चा होत आहे, पण त्याचबरोबर राज्यातील पंढरपूर -मंगळवेढा येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल मोठा उत्सुकतेचा ठरला. राष्ट्रवादीचे (NCP) दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी येथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका मिळाला आहे. भाजपचे (BJP) समाधान आवताडेंनी 7,500 मतांनी आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. अद्यापत याची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.
(NCP gets blow in Pandharpur but gains in Kerala; BJP ‘satisfied’ in Pandharpur)
राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भारत भालके यांच्या मुलाला म्हणजेच भागीरथ भालके यांनी तिकट देत निवडणूक लढविण्यास सांगितलं. तर भाजपकडून (BJP) समाधान आवताडे यांना संधी देण्यात आली होती. दोन्ही पक्ष आपआपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. या प्रयत्नात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील सभेची कॉपी करत पंढरपूर येथे पावसात सभा घेतली. शरद पवार यांनी साताऱ्याच्या पावसात ज्याप्रकारे आग लावली त्याचप्रमाणे जयंत पाटलांनी प्रयत्न केला परंतु पंढरपूरच्या पावसात मात्र साताऱ्याच्या पावसा इतका जोर दिसला नाही.
एक्झिट पोलनुसार समधान आवताडे यांना पंढरपूर शहरात 45 टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये 36 टक्के आणि मंगळवेढ्यात 46 टक्के असे त्यांना सरासरी 44 टक्के मतदान होताना दिसत आहे. तर भगीरथ भालके यांना पंढरपूर शहरात 46 टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये 43 टक्के आणि मंगळवेढ्यात 40 टक्के असे त्यांना सरासरी 42 टक्के मतदान होताना दिसत आहे. तर सिद्धेश्वर आवताडे यांना सरासरी 3 टक्के, सचिन शिंदे यांना सरासरी 4 टक्के, शैला गोडसे यांना सरासरी 3 टक्के आणि इतरांना सरासरी 4 टक्के मतदान होताना दिसत आहे. दरम्यान एक्झिट पोलनुसार अवताडे हे विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
राष्ट्रवादीला केरळमध्ये यश…
केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये डाव्या पक्षांनी जोरदार मुसंडी मारत सत्ता कायम राखली आहे. (Kerala Assembly Election Result 2021 ) दरम्यान, डाव्या पक्षांच्या एलडीएफ या आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही घवघवीत यश मिळवले आहे. राष्ट्रवादी कांग्रेसने केरळमध्ये तीन जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी, दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे.
डाव्या पक्षांसोबत आघाडी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने एलाथूर, कुट्टानाद आणि कोट्टाकल या तीन मतदारसंघात उमेदवार दिले होते. त्यातील एलाथूर आणि कुट्टानाद येथे राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर कोट्टाकल मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पिछाडीवर आहे.
एलाथूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ए. के. ससीधरन यांनी आघाडी घेतली आहे. ससीधरन यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत 21 हजार 464 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार सुल्पिकार मयुरी यांना 11 हजार 792 मते मिळाली आहेत. तर भाजपाचे टी. पी. जयचंद्रन मास्टर यांना 8 हजार 172 मते मिळाली आहे.
तर कुट्टानाद मतदारसंधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार थॉमस के थॉमस हे 20 हजार 763 मतांसह आघाडीवर आहेत. तर केरळ काँग्रेसचे जेकब अब्राहम 16 हजार 671 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
कोट्टाकल मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीचा उमेदवार पिछाडीवर पडला आहे. येथील राष्ट्रवादीचे उमेदवार एन. ए. मोहम्मद कुट्टी पिछाडीवर आहेत. येथे इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रा. अब्दुल हुसेन थंगल 36 हजार 443 मतांसह आघाडीवर आहेत.
(Kerala Assembly Election Result 2021 )