माझं गाव

धारुरचा आणखी एक प्रतिष्ठित व्यक्तीमत्व कोरोनाने हिरावला; गोविंदलाल तोष्णीवाल यांचे निधन.

किल्लेधारूर दि.26 एप्रिल – शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती गोविंदभाऊ हरिभाऊ तोष्णीवाल (72) यांचेवर बीड येथे उपचार सुरु असताना आज दि.7 शुक्रवारी निधन झाले. गोविंदभाऊ यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

(Another distinguished personality of Dharur was deprived by Corona; Govindlal Toshniwal passed away.)

दिवसेंदिवस कोरोना (Corona) संकट आणखी गडद होत आहे. दररोज मृत्यूचा आकडा वाढत असतानाच जवळपासच्या व्यक्ती कोरोनामुळे दगावत (Corona death) आहेत. शहरातील लोकांचा विमा (LIC) उतरवणारे गोविंदलाल तोष्णीवाल यांच्यावर बीड येथे उपचार सुरु होते. दि.1 मे रोजी त्यांना कोरोनाचे (Corona) निदान झाले होते. आज प्रकृती खालावल्यामुळे त्यांना औरंगाबादकडे नेत असताना त्यांची प्राणज्योत मावळली.

गोविंदभाऊ तोष्णीवाल शहरात एक नामवंत व्यक्ती होते. जुन्या काळात धारुर (Dharur) शहरात सर्वप्रथम मंगल साहित्य सेवा देणारे, मंडप डेकोरेटर, वृत्तपत्र विक्रेते ते एलआयसीचे (LIC) विमा प्रतिनिधी म्हणून शहरात ओळखले जात. ते आपल्या मित्र परिवारासह अनेक सामाजिक कार्यात पुढाकार घेत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्यावर धारुर येथील वैकुंठधाम स्मशानभुमीत शासनाच्या नियमाधिन राहुन कोविड नियमांचे पालन करुन अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन विवाहित मुली असा परिवार आहे. ते दिवंगत प्रेमचंद तोष्णीवाल गुरुजी यांचे बंधू होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!