बीड जिल्ह्याची आजची संख्या 1015 ; धारुर 60 तर केज 139, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.13 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4283 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1015 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3238 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s number of Beed district 1015; Dharur 60 and Kaij 139, see taluka wise statistics.)
आज एकुणसाठाव्या दिवशी बीड तालुक्यात 256 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 130, आष्टी तालुक्यात 129 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 60 तर केजमध्ये 215 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-256, अंबाजोगाई-130, आष्टी-129, धारुर-60, गेवराई-91, केज-139, माजलगाव-51, परळी-45, पाटोदा-38, शिरुर-52, वडवणी-24 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या बाराशेवर स्थिर आहे. दररोज येणारी आकडेवारी पेक्षा आता बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला ब्रेक देत 45 पेक्षा जास्त वयोगटातील दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरु ठेण्यात आले आहे. आज शिथिलता संपूनही बाजारात प्रचंड गर्दी दिसुन आली. फळ, भाजी विक्रेत्यांमुळे गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आज देशात कोरोना विषाणूची 3 लाख 62 हजार 406 नवीन प्रकरणे आढळली आहेत, तर याच काळात 4,126 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 37,04,099 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर 1,93,82,642 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.