बीड जिल्ह्याचे आजचे अपडेट; धारुर 56 तर केज 108, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.19 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4068 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 975 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3093 जण निगेटिव्ह आली आहेत. राज्या पाठोपाठ बीड जिल्ह्यातही बाधितांची संख्या कमी झाली आहे.
(Today’s update of Beed district; Dharur 56 and Kaij 108, see taluka wise statistics.)
आज बीड तालुक्यात 327 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या बीड पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 79 व आष्टी तालुक्यात 94 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 56 तर केजमध्ये 108 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे. जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, आष्टी नंतर केज व गेवराईत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-327, अंबाजोगाई-79, आष्टी-94, धारुर-56, गेवराई-70, केज-108, माजलगाव-53, परळी-30, पाटोदा-88, शिरुर-49, वडवणी-21 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दररोज हजारावर येत आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या अधिक असलेल्या 10 जिल्ह्यात बीडचा समावेश आहे. आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोरोना स्थितीबाबत संवाद साधणार आहेत.
राज्याची स्थिती….
राज्यात बाधित रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. आज आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात 28 हजार 438 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी 52 हजार 898 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
एकीकडे रिकव्हरी रेट हळूहळू वाढत असताना राज्यातला मृत्यूदर मात्र कमी होत नाहीये. तसेच, मृतांचा आकडा देखील अजूनही मोठाच आहे. आरोग्यविभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात मंगळवारी 679 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण मृतांचा आकडा 83 हजार 777 इतका झाला आहे. तसेच मृत्यूदर देखील 1.54 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.