2 हजारांच्या नोटा होणार हद्दपार; 100 च्या नोटाबद्दलही आरबीआयचा मोठा निर्णय.

नवी दिल्ली दि.30 मे – देशाच्या चलनात नोटबंदीनंतर (Demonetization) नव्याने समाविष्ट झालेल्या 2 हजारांच्या नोटा (2 thousand notes) लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे. कारण, आता 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) हळूहळू चलन प्रणालीमधून 2 हजार रुपयांच्या नोटा काढण्यास सुरूवात केली आहे. 2021-2022 या आर्थिक वर्षात 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या जाणार नाहीत, अशी घोषणा आरबीआयने केली आहे. मागील वर्षी देखील आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नव्हत्या. आरबीआयने आपल्या नुकतीच वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. यासोबतच 100 च्या नवीन वॉर्निक नोटा चलनात येण्याची शक्यता आहे.
(2 thousand notes will be deported; RBI’s big decision.)
नोटाबंदीनंतर 2 हजार रुपयांची नोट आणली
भारतात नोटाबंदी (Demonetization) केल्यानंतर 2016 मध्ये चलनात 2 हजार रुपयांची नोट (2 thousand notes) आणली होती. परंतु मोठी मूल्यवान नोट असल्याने ही नोट बनावट चलन बाजारात जाण्याचा धोकाही जास्त आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2021 मध्ये एकूण पेपर रोख 0.3 टक्क्यांनी घटून 2,23,301 लाख युनिट्सवर पोचली. मूल्याच्या दृष्टीने मार्च 2021 मध्ये 4.9 लाख कोटी रुपयांच्या 2 हजारच्या नोट चलन प्रणालीमध्ये होत्या, तर मार्च 2020 मध्ये त्याचे मूल्य 5.48 लाख कोटी रुपये होते.
3 वर्षांत 2 हजारच्या नोटा झाल्या कमी
आरबीआयच्या अहवालानुसार, मार्च 2018 मध्ये 2000 प्रणालीत 336.3 कोटीच्या नोटा होत्या, परंतु 31 मार्च 2021 मध्ये या संख्येत घट होऊन 245.1 कोटींवर आली आहे. म्हणजेच या तीन वर्षात 91.2 कोटी नोटांना चलन प्रणालीवरून बाहेर काढल्या गेल्या आहेत.
500 रुपयांच्या नोटा चलनात अधिक
आरबीआयच्या या अहवालानुसार, 31 मार्च 2021 पर्यंत चलनात (currency) एकूण बँक नोटांमध्ये 500 आणि 2,000 रुपयांच्या नोटांचा वाटा 85.7 टक्के होता. तर 31 मार्च 2020 अखेरपर्यंत हा आकडा 83.4 टक्के होता. यामध्येही प्रमाणानुसार, 31 मार्च 2021 पर्यंत चलनात (currency) असलेल्या नोटांमध्ये 500 रुपयांचा नोटांचा हिस्सा सर्वाधिक 31.1 टक्के होता.
दरम्यान, आरबीआय (RBI) लवकरच 100 रुपयांची झगमगती नोट आणण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार ही नोट फाटू शकणार नाहीत. तसेच तिला कापताही येणार नाही. अनावधानाने खिशात राहिल्यास ती पाण्यात भिजणारही नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 100 रुपयांच्या वॉर्निक लावलेल्या नोटा चलनात आणण्याची तयारी केली आहे. आरबीआय अशा एक अब्ज नोटा छापणार आहे.
नोटांना टिकाऊ आणि सुरक्षित बनवणे हा वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणण्यामागचा हेतू आहे. मात्र सध्यातरी केवळ प्रायोगिक तत्त्वावर या नोटा चलनात आणल्या जातील. हा प्रयोग यशस्वी ठरल्यावर हळूहळू वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणल्या जातील आणि जुन्या नोटा व्यवहारातून बाद केल्या जातील.