बीड व परभणी जिल्ह्यातही आढळले मॅग्नेटीक मॅन; उत्सूकता पोहोचली शिगेला.

बीड/परभणी – नाशिक (Nashik) येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची कोव्हिशिल्ड (Covishield) लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर धातूचे नाणे (coins) आणि स्टेनलेसस्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार नुकताच समोर आल्या नंतर आता परभणी व बीड (Parbhani and Beed) जिल्ह्यात असाच काहीसा प्रकार घडला आहे.
(Magnetic man also found in Beed and Parbhani districts; Curiosity reached high.)
शहरातील जणप्रिय नगरात राहणारे व्यवसायाने ऑप्टिकल चालवणारे 41 वर्षीय गजानन पाटेकर यांना देखील हाच अनुभव आला आहे. नाशिक येथील अरविंद सोनार याची बातमी पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या शरीरावर धातूची नाणी आणि काही स्टीलच्या वस्तू चीटकवन्याचा प्रयोग केला.
तर ती आकर्षण घेत आहेत असा अनुभव त्यांना आला मात्र याचा त्यांना कसलाही त्रास होत नसल्याचे ही ते सांगत आहे. यामागील विज्ञान काय आहे? हे नेमके सांगणे कठीण असले तरी लसीकरणानंतर हा प्रकार झाल्याचा दावा पाटेकर करत आहे. तरी मात्र लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे ही ते सांगत आहेत .
शहरातील जणप्रिय नगरात राहणारे व्यवसायाने ऑप्टिकल चालवणारे 41 वर्षीय गजानन पाटेकर यांना देखील हाच अनुभव आला आहे. नाशिक येथील अरविंद सोनार याची बातमी पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या शरीरावर धातूची नाणी आणि काही स्टीलच्या वस्तू चीटकवन्याचा प्रयोग केला.
बीड जिल्ह्यातील कुप्पा ता.वडवणी येथेही असाच प्रकार.
बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे आढळला मॅग्नेटीक मॅन (magnetic man) चा प्रकार आढळून आला आहे. कुप्पा येथील रहिवासी असलेल्या हरिभाऊ लक्ष्मण वडचकर वय अंदाजे 65 वर्ष यांच्या शरीरावर कुठल्याही धातुच्या वस्तू चिकटत असल्याचे समोर आल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
हरिभाऊ लक्ष्मण वडचकर यांनी मंगळवार 8 जुन रोजी कोव्हिशिल्ड (Covishield) लसीचा पहिला डोस घेतला होता. नाशिक कडील बातमी पाहून श्री वडचकर यांनी देखील आपण हे करुन पाहु म्हणत अंगाला स्टिल च्या वस्तू चिकटावुन पाहील्या तर आश्चर्य त्यांच्या अंगाला ही या स्टिल च्या वस्तू चिकटत असल्याचे समोर आले आहे. याबाबत येथील रहिवासी असणारे जिल्हा परिषद सदस्य औदुंबर सावंत यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देऊन तपासणी करण्याचे सांगितले आहे.
दि.10 जून रोजी सर्वप्रथम नाशिक येथील सिडको भागात मॅग्नेटीक मॅन (magnetic man) चा प्रकार समोर आला. यापाठोपाठ नाशिकच्याच अंबड व आता परभणी व बीड जिल्ह्यात असे प्रकार आढळून आले आहेत. तर इचलकरंजीतही एकाने असा दावा केल्याची चर्चा आहे. दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असताना मात्र याबाबत अद्याप आरोग्य विभागाने कसलाही खुलासा केला नाही. लोकांची याबाबत जाणून घेण्याची उत्सूकता आता शिगेला पोहोचली आहे.