बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.20 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 4224 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 155 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4069 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)
अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-34, अंबाजोगाई-8, आष्टी-25, धारुर-6, गेवराई-15, केज-23, माजलगाव-15, परळी-4, पाटोदा-6, शिरुर-9, वडवणी-10 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत गेल्या काही दिवसात किंचित वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे चिंतेत भर पढत आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर गेल्या आठवड्यापेक्षा वाढला आहे. मराठवाड्यात बीड व उस्मानाबाद वगळता सर्व जिल्हे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहेत. मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.
राज्यात दिवसभरात 8,912 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10,373 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,10,356 इतकी झाली आहे. आज 257 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 1,32,597 अॅक्टिव्ह केसेस आहेत.