आता मराठवाड्यातील या जिल्ह्यात ई-पासचे बंधन; पहा काय आहेत निर्बंध.

जालना दि.28 जून – राज्य शासनाकडून संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आजपासून राज्यभर नविन मार्गदर्शक तत्वे (guidelines) लागू करण्यात आली आहेत. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता जालना जिल्ह्यातही ई-पासचे (e-pass) बंधन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी जाहिर केले.

(Now e-pass is restricted in this district of Marathwada; See what the restrictions are.)

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी दि.27 जून रविवारपासून सकाळी 5 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. तसेच जिल्ह्यासाठी नवीन निर्बंध (restrictions) जारी करत मार्गदर्शक सुचना (guidelines) जारी केल्या आहेत.

तसेच सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा (essential services) वगळता सर्व दुकाने, आस्थापना 4 वाजेपर्यंत खुल्या असतील. मात्र शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा (essential services) वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत, असे जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले आहे.

असे असतील नवीन निर्बंध (restrictions)
-अंत्यविधीसाठी वीस तर लग्नविधीसाठी 50 लोकांना जमण्यास मुभा
-व्यायाम शाळा, केशकर्तनालाये, ब्युटी पार्लर 4 वाजेपर्यंत खुले राहतील.
-कृषी व कृषिसेवेला पूरक सेवा देणारी दुकाने 4 वाजेपर्यंत खुले राहतील.
-कोरोनाचे नियम पाळून मालवाहतूक सुरू राहील.

-शनिवार, रविवार या दोन दिवसात पार्सल सेवा किंवा घरपोच सेवा उपलब्ध
-मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे पूर्णपणे बंद
-शासकीय कार्यालये 50 % क्षमतेने सुरु राहणार असून कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार आहे.
-सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी बंद राहतील.
-बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांना ई-पास (e-pass) बंधनकारक

तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोरोनाचे नियम पाळणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद, पोलीस विभाग, नगरपरिषद, नगर पंचायतचे मुख्याधिकारी व स्थानिक प्रशासन यांच्यावर असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!