धारुरचा ‘योगेश काळे’ छोट्या पडद्यावर; ‘सोन्याची पावलं’ मालिकेत गुरुजीच्या रुपात.

किल्लेधारूर दि.9 जुलै – शाळेतील नाटकात छोट्या छोट्या भुमिका करणारा योगेश काळे कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवर नव्याने सुरु झालेल्या ‘सोन्याची पावलं’ (Sonyachi Pawal) या मालिकेतून (TV serial) घराघरात पोहचत आहे.
(Dharur’s ‘Yogesh Kale’ on small screen; As Guruji in the series ‘Golden Steps’.)
धारुर शहर तसं पुर्वीपासूनच सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेलं आहे. शहरात पुर्वापार वेदाभ्यास करुन पुजापाठ करणाऱ्या ब्राम्हण समाजाचा नावलौकिक आहे. याच शहरातील काळे परिवार सध्या मुंबई येथे डोंबिवली भागात वास्तव्यास आहेत. पारंपारिक पुजा अर्चना करुन योगेश काळे याने मुंबईत आपला ठसा उमटवला.
सुप्रसिद्ध डायरेक्टर व प्रोड्युसर (Director and Producer) श्रावणी देवधर यांच्याकडे पुजे निमित्तानं आलेल्या संपर्कातून थेट मालिकेत गुरुजीची भुमिका करण्याची संधी योगेशला चालून आली. कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवर 5 जुलैपासून सोमवार ते शनिवारी प्रदर्शित होणाऱ्या सोन्याची पावलं या मालिकेत योगेश काळे ब्राम्हणाची भुमिका साकारत आहे.
पहिल्या तीन ते चार भागात त्याने भुमिका केली असून यातून तो घराघरात गेला आहे. या मालिकेत आदित्य दुर्वे व ज्योती निमसे यांच्या प्रमुख भुमिका असून रागिनी सामंत, रोहित देशमुख, मयुर मोरे या नवोदीत कलाकारांसह योगेशने यात भुमिका केली आहे. कलर्स मराठीवरील या मालिकेस सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
डायरेक्टर व प्रोड्युसर (Director and Producer) श्रावणी देवधर यांनी विश्वास टाकून दिलेल्या संधीचं सोनं करणार असून भविष्यातही चांगल्या भुमिका करुन बालपणीची अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा मुर्त स्वरुपात आणणार असल्याची प्रतिक्रिया योगेशने दिली. सर्वांनी ‘सोन्याची पावलं’ (Sonyachi Pawal) ही मालिका (TV serial) आवर्जून पहावी असे आवाहन योगेश काळे याने केले आहे.